Jeremiah 45

बारुखाला यिर्मयाचा संदेश

1नेरीयाचा मुलगा बारूख याला यिर्मया संदेष्ट्याने हे वचने सांगितली आहेत. हे त्यावेळी घडले जेव्हा यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम याच्या चौथ्या वर्षात, याने ही वचने यिर्मयाच्या तोंडून ऐकून पुस्तकात लिहिली. तेव्हा यिर्मया संदेष्ट्या त्याच्याशी जे वचन बोलला. ते म्हणाले, 2हे बारूखा, “परमेश्वर, इस्राएलाचा देव, तुला असे म्हणतो, 3तू म्हणालास, मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कण्हण्याने मी थकलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मला विश्रांती मिळत नाही.

4तू त्याला असे सांग, परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जे काही मी बांधलेले आहे, मी आता मोडून टाकीन. मी जे लावले, ते मी आता उपटून टाकीन. हे सर्व पृथ्वीवर सत्य होईल. पण तू आपणासाठी मोठ्या गोष्टींची आशा करतोस काय? त्याची आशा करू नकोस. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, सर्व मानवावर अरिष्ट येईल, पण जेथे कोठे तू जाशील तेथे तुला तुझे जीवन लूट असे मी देईन.”

5

Copyright information for MarULB